प्रोटिन्स, कॅल्शियम योग्य प्रमाणात शरीरात असेल तर तुम्ही व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकता. त्यासाठी दिवसभरातून डाळी, दूध, दही, पनीर, अंडी, खजूर या पदार्थांचा समावेश असलेला आहार करा. त्यामुळे तुम्हाला प्रोटिन्स मिळतील व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच दिवसभरातून २० ते १५ मिनिटे वेळ काढून व्यायाम करा. व्यायामामुळे शरीर लवचिक राहील. फुफ्फुसाच्या व्यायामामुळे फुफ्फुस बळकट होत असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कोरोना होऊन गेल्यानंतरही अशक्तपणा जाणवतो. चालल्यावर थकून जायला होते. यासाठी कोरोनातून बरे झाले तरी त्यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. आहारात प्रोटीन्स असणे अतिशय महत्त्वाचे आहे. शरीराला सी व्हिटॅमिन मिळावा, यासाठी आवळा सरबत, आवळा कॅंडी, लिंबूपाणी यापैकी काहीतरी घ्यावे. तसेच एखादे संत्रे किंवा किवी फळ खावे. यामुळे इन्फेक्शन नियंत्रित करण्यासाठी मदत होते.
- डॉ. योगेश पाटील, सामान्य रुग्णालय, मालेगाव (२१ योगेश पाटील)