पिंपळगांव बसवंत : शहरात संविधान दिना निमित्ताने भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय तरुण व तरुणींनी,महिला ,पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हि रॅली आंबेडकर नगर ,लभडे गल्ली,ग्रामपंचायत मार्गी,जुना आग्रा रोड कर्मश करत निफाड फाटा कडे या रॅलीची समाप्ती करण्यात आली.निफाड फाट्यावर छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्य हार अर्पण करून, संविधान संदर्भात पिंपळगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेश मनोरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन उपस्थित नागरिकांनकडुन करून घेतले.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजा गांगुर्डे,पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,गोरख गांगुर्डे ,सिद्धार्थ पवार यांनी उपस्थिताना संविधाना बद्दल मार्गदर्शन केले,संविधान घरोघरी व पर्त्येक तरुणाला कळावे यासाठी संविधानाची प्रतिज्ञा घेतली व राष्ट्रगीत करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी युवराज गांगुर्डे, उमेश गांगुर्डे,गोरख गांगुर्डे,अमोल बागुल, अविनाश केदारे ,संतोष गांगुर्डे.बापू पाटील,प्रशांत घोडके .आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सिद्धार्थ पवार, तुषार गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे,साहिल गांगुर्डे,सुदर्शन गांगुर्डे, उत्तम गांगुर्डे, भूषण गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, वंदना गांगुर्डे,बंटी गांगुर्डे, गायत्री गांगुर्डे, चेम्स भाई ,सोनू गांगुर्डे, धनंजय गांगुर्डे, इत्यादिसह अनेक विद्यार्थी व महिला पुरुषांनी परिश्रम घेतले.
संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली .....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:09 PM
पिंपळगांव बसवंत : शहरात संविधान दिना निमित्ताने भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय तरुण व तरुणींनी,महिला ,पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हि रॅली आंबेडकर नगर ,लभडे गल्ली,ग्रामपंचायत मार्गी,जुना आग्रा रोड कर्मश करत निफाड फाटा कडे या रॅलीची समाप्ती करण्यात आली.
ठळक मुद्देसंविधान घरोघरी व पर्त्येक तरुणाला कळावे यासाठी संविधानाची प्रतिज्ञा घेतली