एकलहरे : परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात. परिसरातील अनेक शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे गायी, म्हशी, शेळ्या दुग्धव्यवसायासाठी पालन केलेल्या आहेत. या दुधाळ जनावरांसाठी बारमाही खाद्य म्हणून घास पिकाची लागवड केली जाते.उसाची कुट्टी, कडबा, मका, हिरवे गवत हे खाद्य त्या- त्या सिझनमध्ये मिळते. मात्र घास हा बाराही महिने दुधाळ जनावरांसाठी मिळू शकतो. एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे परिसरातील बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणात घासची लागवड करून घरच्या जनावरांसाठी वैरण म्हणून वापरतात. परंतु काही शेतकरी याचा व्यापारही करतात. व्यापारी वापरासाठी दोन-चार बिघे घास पेरून तो कापून व्यापाऱ्यांना विकला जातो. व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा घास बांधावरच विकत घेऊन तो बाजारामध्ये नेतात. मोठमोठ्या गोठे, तबेलेवाल्यांना व्यापारी घासचा पुरवठा करतात. नाशिक शहरालगत म्हशींचे अनेक गोठे आहेत. या गोठेवाल्यांना नियमित घास पुरवठा करणारे काही व्यापारी आहेत. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात घेतलेल्या घासच्या प्रत्येक पेंढीमागे दोन-तीन रुपये जरी मिळाले तरी वाहतूक खर्च वजा जाता व्यापाºयांना चांगला नफा मिळतो व शेतकºयांनाही रोख पैसा मिळतो.घासची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी घरीच तयार केलेले गावठी बी वापरतात. ७०० ते ८०० रुपये किलोने हे बी विकतही मिळते. बिघाभर घासची लागवड करण्यासाठी साधारण १० ते १२ किलो बी लागते. तत्पूर्वी ३ ते ४ ट्रॅक्टर शेणखत पसरून ४ फूट रुं दीचे वावरभर लांब मोठमोठे वाफे तयार करून लागवड केली जाते. पाणी भरल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी लहान घासची पहिली कापणी केली जाते. काही शेतकरी उंदीर लागू नये म्हणून एका आड एक वाफे कापतात. तर व्यापाºयाला विकण्यासाठी सरसकट कापणी केली जाते. एका वाफ्यात साधारण ५० पेढ्या घास निघतो. एक वाफा कापण्यासाठी ९० रु पये मजुरी दिली जाते. घास कापून, त्याच्या पेंंढ्या बांधून ठोक पद्धतीने १०ते १२ रुपये पेंढीप्रमाणे व्यापाºयाला बांधावरच विकला जातो. मार्च ते जून या चार महिन्यांत घासाला चांगला भाव मिळतो. एकदा लागवड करून खत पाणी वेळेवर दिले की नंतर फारशी मशागत करावी लागत नाही.कमी खर्चात उत्पन्नएकदा कापणी झाल्यावर पुन्हा २१ ते २५ दिवसांनी पूर्ण वाढ झाल्याने पुन्हा कापणी करावी लागते. कापणीची मजुरी व पेंढी बांधने या व्यतिरिक्त फारसा खर्च येत नसतो. एकदा लावलेला घास दोन ते तीन वर्षे पुरतो. त्यामुळे दर २५ दिवसांच्या अंतराने खर्च वजा जाता बिघाभर घासचे ८ ते १० हजार रु पये शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकºयाचा घरखर्च, विजेचे बील, पेट्रोलपाणी, मुलांची शाळेची शुल्क खर्च भागविला जातो. त्यामुळे इतर नगदी पिकांबरोबरच घासचे पीक उपयुक्त ठरते, असे शेतकरी सांगतात.
एकलहरेत घास पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:13 AM