लासलगाव : येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टी पी टायरच्या गोडाउनला सोमवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने आसपासच्या परिसरात आगीची धग जाणवत होती. आगीमुळे शेजारील कांद्याच्या गोडाउनलादेखील काही ठिकाणी आग लागल्यामुळे कांद्याच्या गोडाउनचेसुद्धा मोठे नुकसान झाले. धुरामुळे हा परिसर पार काळवंडून गेला होता. या आगीचे कारण व आगीत नेमके किती नुकसान झाले, हे अद्याप समजू शकलेले नाही.या गोडाउनमधील लाखो रुपये किमतीचे सर्वच टायर जळल्यामुळे प्रचंड धूर निर्माण झाला. आग विझवण्याच्या कामात धुरामुळे अडथळे येत होते. या ठिकाणी बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे रेल्वे स्टेशन मार्गावरही रहदारी खोळंबली होती. लासलगावला अग्निशामकची गाडी नसल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. पिंपळगाव बसवंत, चांदवड, मनमाड व येवला येथून तातडीने अग्निशामकच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. सुरुवातीला लासलगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक युवकांनीदेखील पाण्याच्या टँकरसह आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे लोळ इतके प्रचंड असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात येत होते.आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून, या घटनेतील पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व पोलीस कर्मचारी करत आहेत. (२९ लासलगाव आग,१,२,३)
लासलगाव येथे टायरच्या गोडाउनला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:12 PM
लासलगाव : येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टी पी टायरच्या गोडाउनला सोमवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने आसपासच्या परिसरात आगीची धग जाणवत होती. आगीमुळे शेजारील कांद्याच्या गोडाउनलादेखील काही ठिकाणी आग लागल्यामुळे कांद्याच्या गोडाउनचेसुद्धा मोठे नुकसान झाले.
ठळक मुद्देआगीची धग लागून जवळच्या कांदा गोडाउनला बसली मोठी झळ