या आगीत गोदामात असलेल्या लाखो रुपयांच्या बारदानाच्या गाठी जळून खाक झाल्या असून, आग लागण्याचे कारण समजले नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लासलगावजवळील पिंपळगावनजीक परिसरातील इंदिरानगरमध्ये मनोज जेठालाल चंदे (रा. नाशिकरोड) यांचे बारदाना गोडाउन असून, या बारदाना गोडाउनमध्ये लाखो रुपये किमतीच्या बारदानाच्या गाठी होत्या. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास या गोदामास आग लागल्याने या आगीत अंदाजे २० लाख रुपयांच्या बारदानाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत.
लासलगाव येथे अग्निशामक बंब नसल्याने लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मिळेल त्याठिकाणाहून व टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे स. पो. नि. राहुल वाघ यांच्या समवेत पो. उ. नि. रामकृष्ण सोनवणे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
(२८ लासलगाव आग)
लासलगाव येथील बारदाना गोदामास लागलेल्या आगीत जळून खाक झालेल्या बारदानाच्या गाठी.
280821\28nsk_24_28082021_13.jpg
लासलगाव येथील बरदान गोदामास लागलेल्या आगीत जळून खाक झालेल्या बरदानच्या गाठी.