शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

मस्त जगुया आनंदाने मंत्र मुळी हा सोडू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:46 AM

नाशिक कवी काव्यमेळाव्यास दाद

ठळक मुद्देनाशिक कवी काव्यमेळाव्यास दाद‘हायकू’ या प्रकारालाही दाद

नाशिक : ‘पहिलं प्रेम असतं पहिल्या पावसानंतरच्या मातीच्या सुगंधासारखं’, ‘दिवसरात्र भूमिका जगते ते आईचे पात्र असते’ या आणि अशा विविध क वितांचे सादरीकरण नाशिक कवी संस्थेतर्फे आयोजित काव्य मेळाव्यात करण्यात आले. वा. गो. कुलकर्णी कलादालन येथे आयोजित या कार्यक्रमात कवींनी विविध कवितांचे सादरीकरण केले.मेळाव्याची सुरुवात भरत शहा यांनी ‘माझं पहिलं प्रेम’ या कवितेने केली. यानंतर विलास पंचभाई यांनी ‘किड्या-मुंग्यांसारखी माणसं असतात, जिथे मिळाला विसावा तिथे विसावतात’, ‘ही पोटाची आग’ ही कविता सादर केली. अतुल देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘कितीक सरले कितीक उरले, आयुष्याला मोजू नका’ या कवितेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली, तसेच डॉ. मंजूषा पुरंदरे यांनी यावेळी सादर केलेल्या ‘हायकू’ या प्रकारालाही उपस्थित कवींनी विशेष दाद दिली.या मेळाव्याप्रसंगी नाशिक कवीचे सदस्य असलेले गोकुळ वाडेकर, सोनाली चव्हाण, गणेश चव्हाण, कस्तुर शेळके, डॉ. सुधीर करमरकर, प्रभा कोठावदे, राधाकृष्ण साळुंखे आदींनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. या काव्यमेळाव्या अंतर्गत कवी गोकुळ वाडेकर यांनी सादर केलेल्या ‘टाहो जुन्या दिसांचा’ या कवितेला प्रथम, डॉ. मंजूषा पुरंदरे यांच्या हायकू काव्यप्रकाराला द्वितीय आणि गणेश सोनवणे यांनी सादर केलेल्या ‘भुंगा’ या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्याम पाडेकर यांनी नवकवींना कविता सादरीकरण पद्धतीबाबत मार्गदर्शन केले तर अनिल माळी यांनी आपल्या क वितेतून जंगल सफरीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. यावेळी प्रमुख पाहुणे श्याम पाडेकर आणि अनिल माळी यांच्यासह नाशिक कवीचे कार्याध्यक्ष शरद पुराणिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक