नाशिक : ‘धन्य धन्य निवृत्ती देवा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन’, ‘विश्वाचा गुरू स्वामी निवृत्ती दातारू’, ‘विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोवला’, ‘सकलही तीर्थे निवृत्तीच्या ठायी’, होये-होये रे वारकरी पाहे-पाहे रे पंढरी अशी आर्त साद घालत जमलेल्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचे बुधवारी (दि.१९) प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. चांदीच्या पालखीतील पादुकांचे हजारो भाविक आणि मान्यवरांनी दर्शन घेतल्यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले.सकाळी झालेल्या स्वागत सोहळ्यात नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते स्वागत करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.बुधवारी सकाळी त्र्यंबक रोडवरील पंचायत समितीच्या प्रांगणात नाशिककरांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीच्या प्रारंभी नगारखाना, त्यानंतर झेंडेकरी, मग आब्देगिरी असा पारंपरिक थाट होता. त्यानंतर मिरवणुकीत आनंदाने सहभागी झालेल्या तुळशीवृंदावनधारी महिला, टाळकरी भजनी मंडळ आणि त्यानंतर चांदीच्या भव्य रथात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची पालखी आणि पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.वारकरी महिला आणि पुरुषांनी फुगड्यांचा फेर धरला, तर कुणी ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘ग्यानोबा माउली तुकाराम’ या ठेक्यावर अन् मृदंगाच्या तालावर फेर धरला. यंदाच्या वर्षी या पालखीत प्रारंभापासून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पंचक्रोशीतील ४७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. या दिंड्यांमध्ये सहभागी सुमारे ७ हजार वारकऱ्यांचे स्वागत आणि अल्पोपहाराची व्यवस्था पंचायत समितीत करण्यात आली होती.त्यानंतर दुपारी जुने नाशिकमधील यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी पालखीच्या स्वागत सोहळ्याची परंपरा शेकडो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू असल्याचे सांगितले.निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पंडित महाराज कोल्हे यांनी, पालखीमार्गावर मोबाइल टॉयलेट पुरवले तर खºया अर्थाने निर्मल वारी ठरू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. त्याआधी ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते वीणेकरी आणि मानकºयांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मखमलाबादच्या श्रीराम भजनी मंडळ आणि अंबडच्या दातीर यांच्या बैलजोड्यांना पालखीचा मान मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे, सभापती अपर्णा खोसकर, हभप रामकृष्ण महाराज लहवितकर, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष पुंडलिक थेटे, संस्थानचे माजी अध्यक्ष संजय धोंडगे,त्र्यंबकराव गायकवाड, बाळकृष्ण महाराज डावरे, मोहन महाराज बेलापूरकर, रत्नाकर चुंभळे, पद्माकर पाटील, नीलिमाताई पवार, ैअमृता पवार आदी उपस्थित होते.राज्य अर्थसंकल्पात निवृत्तिनाथ देवस्थानसाठी ५० कोटीसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निधीसाठी आमदार बाळासाहेब सानप आणि विश्वस्तांसह दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. त्यामुळेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या परवाच्या अर्थसंकल्पामध्ये देवस्थान जीर्णोद्धारासाठी ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असल्याचे संस्थान अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांनी सांगितले. मात्र, तो निधी मिळण्यासह कार्य पुढे नेण्यासाठी वारकºयांनीदेखील योगदान दिल्यास मंदिराचा कळसदेखील सोन्याचा करता येईल, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.
विश्वाचा गुरू स्वामी निवृत्ती दातारू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:25 AM