शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तुल्यबळ लढती रंगणार

By admin | Published: January 28, 2017 12:57 AM

रस्सीखेच : महिला आरक्षणाने निराशा

महेश गुजराथी चांदवडपंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील धोडंबे गण सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून, या गणात सत्तेसाठी तुल्यबळ लढत रंगणार आहे. सर्वच पक्षाच्या वतीने आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून पुरुष सरसावले असले तरी आतापर्यंत झेरॉक्स प्रतीच पुढे होत आहे.या गणातील सत्ता बरेच काळ कॉँग्रेस कधी अपक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेसची असल्याने या गणात आता पाच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती तर सन १९६५ ते १९६७ या काळात कै. दामोदर काशीराम रकिबे यांनी सभापतिपद भूषविल्यानंतर १९९४ ते १९९७ या कालावधीत दुधखेड येथील पोपटराव विष्णू पगार यांनी सभापतिपद कॉँग्रेसच्या कारकिर्दीत उपभोगले. माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली चांगले कामकाज त्यांनी केले. २००२ ते २००५मध्ये विठाबाई सुक्राजी गायकवाड यांनी सभापतिपद भूषविले. त्यानंतर सन २००७ ते २००८ मध्ये वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अरविंद दामोदर रकिबे यांनी सभापतिपद भूषविले. त्यामुळे या धोंडबे गणाला एक वेगळा इतिहास आहे. सन २००७च्या निवडणुकीत या गटातील धोडंबे गणाचे सदस्य अरविंद रकिबे हे अपक्ष निवडून आले असताना त्यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली होती. नंतर त्यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेशही केला.धोडंबे पंचायत समिती गणात एकूण १९ गावांचा समावेश आहे. या गणाची लोकसंख्या २७ हजार ६३१ असून, या गणात धोडंबे, कानमंडाळे, शेरीसलाबन, कुंडाणे, पुरी, खेलदरी, विजयनगर, एकरुखे, दह्याने, जांबुटेक, चिखलांबे, बोराळे, शिवरे, पारेगाव, इंदिरानगर, दुधखेड, नवापूर, हट्टी, जैतापूर या गावांचा समावेश आहे. सन २००७ च्या निवडणुकीत या गणातून अपक्ष अरविंद रकिबे हे निवडून आले. त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून सभापती झाले. सभापती होऊनपण त्यांनी या गणात काही प्रमाणात विकासकामे केलीत. मात्र सर्वपक्षीयांना बरोबर घेऊन त्यांनी काम केले हा त्यांच्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून विद्यमान सदस्य मनीषा जाधव या निवडून आल्या. त्यांनीपण चांदवड पंचायत समितीचे उपसभापतिपद उपभोगले तरी त्यांनी बोराळे गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली, शिवरे ते वणी, शिवरे फाटा बोराळे ते बोराळे फाटा रस्ता डांबरीकरण, महामंडळाकडून बोराळे व शिवरे असे दोन बंधारे असे अनेक कामे केली आहेत. त्यात चांदवड पंचायत समितीत महिलाराज असल्याने त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी चांदवड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले.