सध्या जिल्ह्यात सुमारे ६०० तर मुंबईतील बेस्टच्या मदतीसाठी १३० बसेस चालविल्या जात आहेत. मुंबईत चालविण्यात येणाऱ्या बसेसेच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च देखील नाशिक मंडळालाच करावा लागतो. शिवाय जिल्ह्यातील बसेससाठी लागणारे साहित्य देखील पुरवावे लागते. असे असले तरी खर्च टाळण्यासाठी साहित्य खरेदी जपूनच केली जात आहे. किरकोळ खरेदी ही लोकल परचेस म्हणून केली जाते तर मोठ्या प्रमाणातील खरेदी ही रेग्युलर पर्चेस म्हणून केली जाते.
रेग्युलर पर्चेस म्हणून मागणी नेांदविलेले साहित्य लॉकडाऊननंतर महामंडळला प्राप्त होत आहे. परंतु हे साहित्य परत पाठविले जात आहे. लाॅकडाऊनच्या काळात बसेस सुरूच नसल्याने साहित्यांची गरज नसल्याचे सांगून असे लाखो रूपयांचे साहित्य पुन्हा कंपनीकडे परत पाठविण्यात आले आहे. सध्या इंजिन, गिअर ऑईल, ब्रेक ऑईलची कमतरता असल्याची चर्चा आहे. याबरोबरच डीएफ सोल्युशन, कुलंटची देखील मागणी आहे मात्र हे साहित्य देखील पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने तगादा वाढला आहे. आगोदरच खरेदीची उधारी असल्याने नव्याने खरेदी करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सध्या बसेस सुरू असल्या तरी खरेदीच्या बाबतीत काहीसा नकरात्मक निर्णय महामंडळाकडून घेतला जात असल्याची तक्रार चालक-वाहक करीत आहेत.
जिल्ह्यातील १३ डेपोमधूनऑईल आणि कुलंटची मागणी होत असतांना तेही पुरेशा प्रमाणात नसल्याने महामंडळा खरेदीबाबत निरूत्साही असल्याचे दिसून येते. किंबहूना खरेदीवरील खर्च कमी करण्याची भूमिका घेतलेलेी दिसते. सध्या पुर्णक्षमतेने बसेस सुरू नसल्यामुळे साहित्य उपलब्ध साहित्यांवर बसेसची देखभाल दुरूस्ती होऊ शकते असे महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.