-------------
गेल्या वर्षी संचमान्यता होऊ शकली नसल्याने शिक्षकांचे सप्टेंबर महिन्यात होणारे समायोजन होऊ शकलेले नाही. ते झाले असते तर शिक्षकांच्या रिक्तपदांची निश्चित माहिती गोळा होण्यास मदत होईल.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी
---------------
रिक्तपदे
मराठी शाळेतील ६९५
उर्दु शाळेतील- ५
-----
सर्वच विषयात शिक्षक पारंगत
जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वच शिक्षक प्रत्येक विषय शिकवितात. त्यामुळे विषयानुरूप तशी वर्गवारी नसली तरी, त्या त्या विषयात रस असलेले शिक्षक आपापसात विषय वाटून घेतात. त्यामुळे कोणत्या विषयाच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असे म्हणता येत नाही. पदवीधर शिक्षकांचा प्रश्न आणखी वेगळा आहे.
-------------
विद्यार्थ्यांचे नुकसान
१ गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय शिक्षणाबरोबरच शिष्यवृत्ती व तत्सम परीक्षांच्या तयारीत अडचणी येत आहेत.
२ गेल्या वर्षी ग्रामीण भागात कोरोनाची काळजी घेत शिक्षकांनी ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता.
३ यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा ओसरू लागल्यामुळे कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
----
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे साहजिकच अन्य सहकारी शिक्षकांवर त्याचा ताण पडत असला तरी, आता टीईटीमुळे काही पदे भरली जाण्याची अपेक्षा आहे. शिवाय आंतरजिल्हा बदलीतून शिक्षक आले तर रिक्तपदांची संख्या कमी होईल.
- वैभव उपासनी, म. रा. प्रा. शिक्षक संघ, सरचिटणीस
-----------
शाळा सुरू व्हाव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल, असे शिक्षक व पालकांनाही वाटू लागले आहे. जोपर्यंत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही तोपर्यंत रिक्तपदांचा अंदाज बांधणे कठीण आहे. समायोजनानेही बऱ्यापैकी प्रश्न सुटेल.
- अर्जुन ताकाटे, म. रा. प्रा. शिक्षक संघ सहचिटणीस