याबाबत माहिती देताना रामबाबा पठारे यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून या चारही युनियनच्या कामगारांचा पगार झालेला नाही. कोरोना असतानाही जीव धोक्यात घालून माथाडी कामगार शासनाचा रेशनचा तांदूळ, गहू, शेतकऱ्यांची खते उतरविण्याचे काम चोवीस तास करतात. त्यांना विमा, वैद्यकीय सुविधा नाहीत. कोरोना काळात सॅनिटायझर, साबण, औषधे कामगारांनी वर्गणी काढून आणली. कोरोनामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबांकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे कामगारांनी वर्गणी गोळा करून या कुटुंबांना मदत केली. २०१९ साली वेतनवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत संपली, तरी नवीन करार नाही.
जिल्हाधिकारी, आरोग्याधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र देऊनही माथाडींना सुविधा मिळत नाही, त्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. कामगारांना सुविधा व न्याय मिळाला नाही, तर चारही संघटना रस्त्यावर उतरतील. मालधक्क्याचा आत व बाहेर एकही मालट्रक जाऊ-येऊ देणार नाही, असे रामबाबा पठारे यांनी सांगितले.
माथाडी कामगार नेते भारत निकम यांनी सांगितले की, माथाडी कामगारांच्या मागण्या व प्रश्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडेही पोहोचविण्यात आल्या असून, त्यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. कामबंद आंदोलनामध्ये अनिल आहिरे, दीपक वाघ, नितीन चंद्रमोरे, सुनील यादव, रवींद्र मोकळ, कृष्णा जगदाळे, राजाभाऊ मोकळ, प्रभाकर रोकडे, कैलास भालेराव आदींसह माथाडी कामगार सहभागी झाले होते.
===Photopath===
250521\25nsk_52_25052021_13.jpg
===Caption===
नाशिकरोड येथे आंदोलन करताना माथाडी कामगार