शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

पारंपरिक मतांवर ठरणार उमेदवारांच्या विजयाचे गणित

By admin | Published: November 18, 2016 10:54 PM

दुरंगी, तिरंगी लढत : विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

 नांदगाव : प्रभाग क्र. ५ व ६ मधील काही लढती एकतर्फी होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये केवळ १८१० मतदार आहेत. अ मधील लढती तिरंगी व ब मधील दुरंगी होत असल्याचे चित्र कागदावर दिसत आहे. विशाल खैरनार (५ अ) (काँग्रेस), संजीव वाघ (अ) (भाजपा), किरण देवरे (अ) (शिवसेना). अक्का सोनवणे (ब) (काँग्रेस), वंदना कवडे (ब) (शिवसेना).कवडेंचा हा पारंपरिक मतदार आहे. कै. रामराव कवडे, बाळासाहेब कवडे, चंद्रशेखर कवडे, राजेश कवडे हे यापूर्वी येथून निवडून गेले होते. कवडे यांचे सामाजिक काम असून, पाणीटंचाईच्या काळात बोअरचे पाणी स्वत: पाइपलाइन टाकून त्यांनी पुरवले आहे. वंदना चंद्रशेखर कवडे सुशिक्षित उमेदवार असून, त्यांचे दीर राजेश कवडे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.आक्का सोनवणे यांची उमेदवारी अरुण पाटील यांच्यामुळे झाली आहे. त्या होलार समाजाच्या असून, १२ वर्षांपूर्वी राजेश बनकर नगराध्यक्ष असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आला होता. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावर झालेल्या नाट्यमय घडामोडींच्या त्या साक्षीदार आहेत. अहेर यांच्या कंपूतून त्या बनकर यांच्याकडे गेल्याने बनकरांवरचा अविश्वास ठराव बारगळला होता. ५ अ मध्ये शिवसेनेचे शहर अध्यक्ष किरण देवरे उभे आहेत. ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. राजेश कवडे यांचे नाव आल्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन कवडे यांनी शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व देवरे यांनी प्रभागातून निवडणूक लढवावी असे ठरले. त्यांच्यासमोर विशाल खैरनार व संजीव वाघ आहेत. वाघ आरएसएसचे असून, त्यांची उमेदवारी गुरुकृपानगर व भाजपा माइंडेड मतदारांच्या भरवशावर आहे. तसे त्या भागाला नवखे असले तरी सामाजिक कामांमधून वेगळी ओळख निर्माण केली आहे. (वार्ताहर)