निफाड : तालुक्यातील नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची शुक्र वारी उत्साहात सांगता झाली. पंधरा दिवसांच्या यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. या यात्रोत्सवाची अधिकृत सांगता झाली असली तरी अजून पाच ते सात दिवस भाविकांचा ओघ सुरूच राहील, अशी माहिती श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केदू बोरगुडे यांनी दिली.मतोबा महाराज यात्रोत्सवास १० जानेवारीपासून प्रारंभ झाला होता. शुक्रवारी भाविकांनी यात्रोत्सवाला प्रचंड गर्दी केली होती. निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव पडीले व पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारु ळे, शरद पवार यांच्यासह ४० कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा कालावधीत मंदिर व्यवस्थापनाने रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी भाविक, व्यावसायिक व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. यात्रोत्सवात सहभागी होणाºया भाविकांसाठी नैताळे ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच यात्रा परिसरात आरोग्य व सफाई राहावी म्हणून पंधरा दिवसांसाठी सफाई कामगारांच्या तात्पुरत्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
मतोबा महाराज यात्रेची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:32 PM
नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची शुक्र वारी उत्साहात सांगता झाली. पंधरा दिवसांच्या यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. या यात्रोत्सवाची अधिकृत सांगता झाली असली तरी अजून पाच ते सात दिवस भाविकांचा ओघ सुरूच राहील, अशी माहिती श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केदू बोरगुडे यांनी दिली.
ठळक मुद्देपंधरा दिवसात लाखो भाविकांची उपस्थिती