कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या युवकाला कोरोनाची लागण झाल्यांनतर त्याच्या संपर्कातील कुटुंबातील इतर चौघांचे चाचणी अहवाल गुरुवारी (दि.२८) निगेटिव्ह आली असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दरम्यान, मौजे सुकेणे गाव सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. मुंबईला बँकेत नोकरीस असलेला युवक गावी परतल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाली होती. बाधिताच्या कुटुंबातील पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्यांनतर सुकेणे परिसरात खळबळ उडाली होती.आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या कुटुंबातील संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. गुरु वारी चौघांना रु ग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, मौजे सुकेणे येथील दोन्ही बाधित लासलगाव कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. वैभव पाटील यांनी दिली.
मौजे सुकेणेकरांनी सोडला नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:31 PM
मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या युवकाला कोरोनाची लागण झाल्यांनतर त्याच्या संपर्कातील कुटुंबातील इतर चौघांचे चाचणी अहवाल गुरुवारी (दि.२८) निगेटिव्ह आली असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ठळक मुद्देबाधिताच्या संपर्कातील चौघांचे अहवाल निगेटिव्ह