नाशिक : मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून अद्याप आरक्षण दिले जात नसल्यामुळे मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौºयानिमित्त ताफ्याच्या मार्गावर उभे राहून काळे झेंडे दाखवित ध्यानाकर्षण आंदोलन केले जाणार होते; मात्र सदर आंदोलनाची कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे भद्रकाली पोलीसांनी चौक मंडई येथूनच आंदोलनस्थळी निघालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. यावेळी समितीचे अध्यक्ष अजीज पठाण, सलीम काझी, रफीक साबीर आदिंचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापासून रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 3:33 PM