मालेगाव : केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप - सेना युतीला विरोध म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विजय मिळविला असून, त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांचा पराभव केला.मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी प्रथम अपक्ष व जनसुराज्य पक्षाकडून आमदार म्हणून काम केले आहे. गेल्यावेळी आघाडी नसल्याने राष्टÑवादीकडून उमेदवारी केलेल्या मौलाना मुफ्ती यांचा कॉँग्रेसच्या आमदार आसिफ शेख यांच्याकडून झालेल्या पराभवाचे त्यांनी उट्टे काढले.यंत्रमागधारकांसाठी सवलतीत वीज, बेरोजगारी, झोपडपट्टीवासीयांनी पक्की घरे देणे आणि यंत्रमागावर काम करणाऱ्या गरीब कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळवून देण्याच्या प्रश्नावर मौलाना मालेगाव मध्य मतदारसंघात मतदारांना सामोरे गेले. मतदारसंघातून आमदार आसिफ शेख यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप करण्यात आला. एमआयएमने औरंगाबाद नंतर मालेगावची जागा प्रतिष्ठेची केली होती. यात एमआयएमचे ओवेसी बंधूंनी शहरात तळ ठोकून झोकून दिले होते.आता कॉँग्रेस विरोधात पूर्वाश्रमीचे कॉँग्रेसचे असणारे युनुस इसा यांनी एमआयएमध्ये आपले प्रस्थ वाढवत मौलानांसाठी व्यूहरचना आखण्यासाठी सूत्रे आपल्या हातात घेत सर्व कॉँग्रेस विरोधकांनी एकत्र येत मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना विजय मिळवून दिला.महिलांच्या तीन तलाकच्या मुद्द्यावर राष्टÑवादीने घेतलेल्या भूमिकेने नाराज होऊन मौलानांनी राष्टÑवादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एमआयएमचा हात धरून मिळविलेल्या उमेदवारीमुळे त्यांना यश मिळवून दिले. राज्यातील युती सरकार विरोधात मुस्लिमांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासठी म्हणून मतदारांनी त्यांना विधानसभेत पुन्हा पाठविले आहे.विजयाची तीन कारणे...1मालेगाव मध्य मतदारसंघात तळ ठोकून मतदारांशी संपर्क साधल्याने त्याचा चांगला फायदा झाला.2केंद्र व राज्य सरकारने मुस्लिमांबाबत घेतलेल्या निर्णयांविरोधात मतदारांशी मांडलेली भूमिका.3कॉँग्रेस विरोधकांची मोट बांधण्यात मिळालेले यश, राज्यासह केंद्रात एमआयएमने घेतलेली भूमिका. ओवेसी बंधूंनी घेतलेल्या प्रचारसभांमधून मांडलेली पक्षाची भूमिका.आसिफ शेख यांच्या पराभवाचे कारण...घराणेशाहीला कंटाळलेले मतदार तसेच कॉँग्रेस विरोधकांची मोट बांधण्यात विरोधक मौलानांच्या समर्थकांना आलेले यश ही त्यांच्या पराभवाची कारणे आहेत. प्रचारातील भावनात्मक मुद्दे प्रभावी ठरले.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते२ शेख आसिफ रशीद कॉँग्रेस 78723३ रऊफखान कादिरखान रिपाइं ए 66४ दीपाली विवेक वारूळे भाजप 1450६ बहबुद अब्दुल खालिक अपक्ष 59७ मोहंमद इमाईल जुम्मन अपक्ष 49८ अ. हमीद शेख हबीब अपक्ष 152९ सय्यद सलीम सय्यद अलीम अपक्ष 412१० अब्दुल वाहिद मोहंमद शरीफ अपक्ष 110११ इरफान मो. इसहाक अपक्ष 50१२ अब्दुल खालिक गुलाम मोहंमद अपक्ष 395१२ मोहंमद रिजवान मोहंमद अकबर अपक्ष 367१३ महेकौसर लुकमान मोहंमद अपक्ष 126
मौलाना मुफ्ती यांनी काढले पराभवाचे उट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:38 AM