मालेगाव मध्य : तिहेरी तलाक विधेयकास विरोध करण्याऐवजी मतदानावेळी राज्यसभेतील राकॉँचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राष्टÑवादीचे माजी आमदार व शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आपल्या २० समर्थक नगरसेवकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मालेगावमध्ये राष्टÑवादीचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शुक्रवारी मौलाना मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी महापौर हाजी इब्राहीम नॅशनलवाला, नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल उपस्थित होते. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी सांगितले, भाजप सरकार अल्पसंख्याक समाजावर अन्याय करीत आहे. त्यातच मुस्लीम समाजास या ना त्या कारणामुळे लक्ष्य केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुस्लीम महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करीत तीन तलाक विधेयक आणून लोकसभेत पारित करण्यात आले; मात्र विरोधकांमुळे राज्यसभेत त्यांना यश आले नाही. २५ जुलै रोजी पुन्हा राज्यसभेत हे विधेयक ठेवण्यात आले. या दरम्यान, भाजपवगळता विरोधी पक्षाने यावर आपल्या सदस्यांना पक्षादेश जारी केला नव्हता. या विधेयकावर घेण्यात आलेल्या मतदानावेळी राष्टÑवादीचे राज्यसभा सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे विधेयक मंजूर करून घेण्यात भाजप यशस्वी झाला असल्याचेदेखील मुफ्ती मो. इस्माईल यांनी सांगितले. (पान ३ वर)पक्षाच्या या कृतीमुळे संविधानाने दिलेले हक्क हिरावून घेतले असून, धार्मिक आस्थेला मोठा धक्का लागला आहे. ज्या पक्षामुळे धर्मावर संकट ओढवत असेल, अशा पक्षात राहणे योग्य नाही. त्यामुळेच राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे मुफ्ती मो. इस्माईल यांनी सांगितले.यावेळी राकॉँचे नगरसेवक अमानतुल्ला पीर मोहंमद, अन्सारी साजीद अहमद, अय्याज अहमद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मुफ्ती मो. इस्माईल शनिवारी हज यात्रेस जात आहे. आगामी विधानसभा लढविणार असून एमआयएम, तिसरा महाज, अपक्ष असे पर्याय खुले आहेत. हज यात्रेवरून परतल्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका जाहीर करू, असे त्यांनी शेवटी सांगितले.वेळेप्रसंगी सर्व नगरसेवकांचाही राजीनामातीन तलाक विधेयकाविरोधात माजी आमदार मुफ्ती मो. इस्माईल यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने ते देशातील पहिलेच नेते ठरले आहे. मनपात राष्टÑवादी व जनता दल (से.) यांची महागठबंधन आघाडी आहे. आमचा मुफ्ती मो. इस्माईल यांना पूर्ण पाठिंबा आहे. वेळप्रसंगी राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक सदस्यत्वाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवक एजाज बेग यांनी घेतली आहे.
मौलाना मुफ्तींचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:59 AM
मालेगाव : तिहेरी तलाक विधेयकास विरोध करण्याऐवजी मतदानावेळी राज्यसभेतील राकॉँचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राष्टÑवादीचे माजी आमदार व शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आपल्या २० समर्थक नगरसेवकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मालेगावमध्ये राष्टÑवादीचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देमालेगावी राष्टÑवादीला मोठा धक्का: तिहेरी तलाक विधेयकाला विरोध न केल्याने नाराजी