सिन्नर : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात तालुक्यातील माध्यमिक शाळांचा तालुकास्तरीय महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये समूहगीत, वैयिक्तक नृत्य, वैयिक्तक गायन, एकपात्री प्रयोग अशा विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या.सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा संस्थेचे माजी संचालक कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रंसगी व्यासपीठावर सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, शालेय समिती सदस्य भाऊसाहेब गोजरे, पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंडोरे, पालक संघाचे सहसचिव संजय धरम, डुबेरे विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. येवले, वडांगळी विद्यालयाचे प्राचार्य के. एस. नवले, भीमराव गोजरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजाराम मुंगसे, मनोज दंडगव्हाळ, बी. टी. नवले, बी. इ. कलकत्ते, राजेंद्र भावसार, संदीप पडवळ आदी उपस्थित होते. मविप्र संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव सुरू केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे कलाविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ संस्थेने उपलब्ध करून दिल्याचे भगत यांनी सांगितले.
सिन्नर येथे वाजे विद्यालयात मविप्रचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 5:55 PM