उत्कृष्ट लेग स्पिनर असलेली माया मधल्या फळीतील फलंदाजदेखील आहे. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षांखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. २०१४-१५ तसेच २०१७-१८च्या हंगामात २३ वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. या कामगिरीच्या जोरावर मायाची मागील हंगामात चॅलेंजर ट्रॉफीसाठी ‘इंडिया ए’ संघात निवड झाली होती.
या राष्ट्रीय शिबिरातून भारतीय संघाची निवड होणार आहे. २९ ऑगस्टला हा संघ रवाना होणार असून, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गुलाबी चेंडूवरील एक कसोटी सामना व तीन एकदिवसीय तसेच तीन टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे.
मूळची सिन्नरची असलेली माया सोनवणे, सिन्नरचे सुनील कानडी यांच्यामुळे क्रिकेटकडे वळली. अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर हे मायाचे प्रशिक्षक आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माया भारतीय संघात स्थान पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला.
100821\10nsk_29_10082021_13.jpg
माया सोनवणे