नाशिक : शहरातील एका बहुउद्देशीय संस्थेने योगदिनाचे महत्व सर्वसामान्यांनाही लक्षात यावे आणि या माध्यमातून योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी योगदिनाचे महत्व पटूवून देणाऱ्या माहितीपटाची निर्मिती केली असून या माहितीपटाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रियांसह योगाची विविद प्रात्यक्षिके आणि त्यांचे महत्व सांगणाºया ध्वनिचित्रफितींचा या माहितीपटात समावेश आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या भीषण काळात योगाच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योगाभ्यासाची उपयुक्तता याविषयातील विविध संदर्भांचाही या माहितीपटात समावेश करण्यात आला आहे. या माहितीपटाचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून या माहीतीपटातून योगाविषयी जनजागृती केली जाणार आहे. यावेळी सई जाधव, ज्योती वाघ,अमोल वाघ,गार्गी साळवे आदी उपस्थित होते.
नाशकात ‘योगदिन माहितीपटाचे’ महापौरांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 4:19 PM
योगदिनाचे महत्व सर्वसामान्यांनाही लक्षात यावे आणि या माध्यमातून योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी नाशिक शहरातील एका संस्थेने योगदिनाचे महत्व पटूवून देणाऱ्या माहितीपटाची निर्मिती केली असून या माहितीपटाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देमाहितीपटातून होणार योगाचा प्रचार प्रसारनाशकातील संस्थेने केली माहितीपटाची निर्मितीमहापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन