शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

प्रभागातील आरोग्य जागृती फेरीविषयी महापौरच अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:41 AM

नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य अधिकारी धडकल्यानंतरच त्यांना फेरीचा उलगडा झाल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.शहरात रोगराई ...

नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य अधिकारी धडकल्यानंतरच त्यांना फेरीचा उलगडा झाल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.शहरात रोगराई वाढत असून, स्वाइन फ्लू व डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने सोमवार (दि. ८) पासून शहरात पाच प्रभागात ही मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एकमध्ये सकाळी ही मोहीम राबविली जाणार असताना महापौर रंजना भानसी, अरुण पवार यांच्यासह या प्रभागाच्या अन्य कोणत्याच नगरसेवकांना कल्पना देण्यात आली नव्हती. गावात महापौरांनी नेहमीच्या ठिकाणी थांबून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक त्यांना अशाप्रकारची मोहीम राबवली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही मोहीम सुरू झाली. यावेळी महापौर भानसी, आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर, पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पूर्व विभागात प्रभाग क्रमांक २३ मध्ये सभापती सुमन भालेराव, मिर्झा शाहिन सलिम बेग व यशंवत निकुळे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सिडको विभागात प्रभाग क्रमांक २५ मध्ये सभापती हर्षा बडगुजर यांच्या हस्ते नाशिकरोड विभागात प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रशांत दिवे, दिनकर आढाव, मंगल आढाव यांच्या हस्ते व सातपूर विभागात प्रभाग अकरामध्ये दीक्षा लोंढे व सीमाताई निगळ, नगरसेविका यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.विविध उपक्रम राबविण्यात येणारसदर मोहिमेत विद्यार्थांना प्रतिज्ञा मार्गदर्शन, प्रभात फेरी, घरोघरी भेट देऊन डास उत्पत्तीस्थाने शोधणे, स्वाइन फ्लू, रु ग्ण परिसरात सर्वेक्षण व स्वच्छता, तसेच नागरिकांना लाउड स्पिकरव्दारे सूचना पत्रके, स्टिकर्स, बॅनर्सव्दारे प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात आले. अशाप्रकारची मोहीम दररोज प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका