सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये महापौर आपल्या दारी हा उपक्र म राबवण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसह प्रभागातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.याप्रसंगी प्रभागातील नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, रत्नमाला राणे, छाया देवांग आदी उपस्थित होते. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रभाग क्र मांक २९ मधील महाकाली चौकात असलेल्या मैदानातील सभागृहात महापौरांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने या प्रभागामधील बहुतांशी सर्व ठिकाणच्या ड्रेनेज लाईनची दुरवस्था झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. या प्रश्नाबरोबरच या प्रभागातील मैदानात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ड्रेनेज समस्या सोडवावी, अशी मागणी विनीता पाटील, जयश्री धारकर, सुभाष घरटे यांनी केली, तर मीराबाई कवडे यांनी पाण्याची वेळ बदलण्यात यावी, असे सांगितले.महाकाली चौकातील देशी दारू दुकानामुळे नागरिकांना तसेच महिलांना त्रास होत असून, देशी दारूचे दुकान त्वरित हटवण्याची मागणी देवचंद केदारे, आशिष पैठणकर, सविता साळुंके, सविता पाटील, सत्यभामा पाटील, अर्चना भडांगे, जयश्री धारकर, हर्षल पगारे यांनी केली. प्रभाग २९ मधील अनेक भागातील पथदीप बंद असून ते सुरू करावे, असे रेखा सोनवणे, कुसुम मते यांनी सांगितले. महाकाली चौकातील मैदानात जॉगिंग ट्रॅकची व्यवस्था करावी याबरोबरच मैदानालगत असलेली महावितरणची डीपी हटविण्यात यावी, अशी मागणी अंकुश वराडे यांनी केली. राणेनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृह हे गेल्या वर्षभरापासून बंद असून, नागरिकांसाठी ते खुले करण्यात यावे, अशी मागणी बाळ भाटिया यांनी केली. तर गणेश चौक परिसरातील सन्मित्र हौसिंग सोसायटीतील मूलभूत सुविधा सोडविण्याची मागणी रामचंद्र गोडबोले यांनी केली. यावेळी महापौर दौºयात महापौर सतीश कुलकर्णी यांनी महिला व नागरिकांनी मांडलेल्या मूलभूत सुविधा त्वरित सोडण्याचे आदेश अधिकाºयांना दिले. यावेळी बाळासाहेब पाटील, रमेश उघडे, दिलीप देवांग, आर. आर. पाटील, भूषण राणे आदींसह महापालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मोकाट जनावरांची समस्या सोडविण्याची मागणीमहाकाली चौकात मागील वर्षी मोकाट जनावरांमुळे एका लहान बालकाला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर मनपाने मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, परंतु यानंतरही येथील महाकाली चौकातील मैदानात मोकाट जनावरांचा वावर असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महापौर दौºयात समस्यांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:26 PM
प्रभाग क्रमांक २९ मध्ये महापौर आपल्या दारी हा उपक्र म राबवण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसह प्रभागातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना सूचना : सिडको भागातील मूलभूत समस्या सोडवण्याचे आदेश