नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांसह चार विषय समित्यांच्या सदस्यांना भेडसावणाºया विविध समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांसह अवघे पदाधिकारी त्या-त्या विभागीय कार्यालयांमध्ये जाणार असून, त्यासाठी दोन दिवस विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.मागील आठवड्यात भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी व नगरसेवक यांच्यात परस्पर समन्वय नसल्याबद्दल पदाधिकाºयांचे कान उपटले होते. याशिवाय, परस्पर निर्णय घेतले जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या झाडाझडतीनंतर आता महापालिकेत सकारात्मक बदल दिसून येऊ लागले असून, त्याची सुरुवात म्हणून प्रभाग समित्यांसह विषय समित्यांच्या सर्व सदस्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष बैठकांचा कार्यक्रम लावला आहे. त्यानुसार, येत्या १२ सप्टेंबरला सकाळी १०.१५ वाजता सातपूर, ११.१५ वाजता सिडको, तर १२.१५ वाजता नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक होणार आहे. तसेच दि. १३ सप्टेंबर रोजी पंचवटी प्रभाग समितीची सकाळी १०.१५ वाजता, पूर्व समितीची सकाळी ११.१५ वाजता, तर पश्चिम विभागाची बैठक दुपारी १२.१५ वाजता होणार आहे.
महापौर जाणून घेणार समित्यांची दुखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:22 AM