नाशिक : विधानसभा निवडणुका संपताच आता महापौरपदाचे वेध लागले असून, त्यासाठी लवकरच मुंबईत सोडत निघणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. अर्थात आरक्षण कोणतेही निघो, परंतु सत्तांतरासाठी विरोधकांपेक्षा शिवसेनेचा आटापिटा सुरू असून त्यामुळे यंदा सत्ता समीकरणे बदलतील काय याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधीच महापौरपदाची निवडणूक होणार होती. मात्र महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. आता विधानसभा निवडणुका संपताच आरक्षणासाठी सोडत होणार असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने हालचाली गतिमान होतील.२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला १२२ पैकी ६६ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला स्वतंत्रपणे ३५ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाकडे पूर्ण बहुमत असल्याने त्यांना कोणत्याही पक्षाची गरज भासली नव्हती. मात्र आता विधानसभा निवडणुकीपासूनच राजकारण बदलू लागले असून, शिवसेनेच्या वतीने भाजपाला अडचणीत आणण्याचे घाटत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आता सत्तेच्या रस्सीखेचला जोरदार सुरुवात आहे. त्याचे पडसाददेखील उमटत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवरून खेचण्यासाठी शिवसेनेने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपासूनच मोर्चेबांधणी करतानाच महापालिकेत सत्तांतरासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांना मधाचे बोट लावले होते. त्यानुरून सानप हे आधी राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुका आता पाच वर्षांनीच होतील त्यामुळे इतका दीर्घकाळ सत्तेशिवाय राहण्याची सानप यांचीदेखील मानसिकता नाही. त्यामुळे हीच संधी साधूनशिवसेनेने सानप यांना गळाला लावल्याचे बोलले जाते. तीस वर्षे भाजपात राहून अनेक पदे इतकेच नव्हे तर शहराध्यक्षपदभूषविणाºया सानप यांच्यामार्फत महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.आता या सर्व हालचाली छुप्या पध्दतीने सुरू असल्या तरी सोडतीनंतर खºया अर्थाने त्यास वेग येणार आहे. आधी सर्वांचे लक्ष सोडतीकडे लागले असून, कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघते त्यावर पुढील खेळी असणार आहे.भाजपची तटबंदी पालकमंत्री करणारमनपात सत्तांतर करण्यास शिवसेना आतुर असून, भाजपा नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू झाली असली तरी भाजपाची सूत्रे पालकमंत्री गिरीश महाजन हेच करणार असून त्यामुळे ते कशी तटबंदी करणार याकडे लक्ष लागून आहे. आता या सर्व हालचाली छुप्या पध्दतीने सुरू असल्या तरी सोडतीनंतर त्यास वेग येणार आहे. सर्वांचे लक्ष सोडतीकडे लागले असून, कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघते त्यावर पुढील खेळी असणार आहे.
महापौरपदाच्या निवडीचे वेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:25 AM