श्याम बागुल ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पूर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षांपासून सापडत नसल्याने जवळपास सव्वातीनशे कामांची देयके रखडली असून, या पुस्तिकांचा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून शोध घेतला जाऊन त्यासाठी संबंधित कामांवर नियंत्रण ठेवणाºया अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली जात असली तरी, काम पूर्ण झाल्यानंतर देयक काढण्यासाठी बांधकाम खात्याकडून जी पद्धत अवलंबिली जाते ते पाहता, सात ते आठ टेबलवरून मोजमाप पुस्तिका फिरत असल्याने सदरच्या पुस्तिका बांधकाम खात्यातच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गत येणाºया पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पूर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणाºया मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखरेख ठेवणाºया संबंधित अधिकाºयांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी (पान ७ वर)मोजमाप पुस्तिकाच गायब(पान १ वरून)कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता, उपअभियंत्यांना पत्रे पाठवून वारंवार कामांच्या मोजमाप पुस्तिकांची मागणी केली आहे. परंतु त्याला अधिकारी दाद देत नसल्याचे पाहून वृत्तपत्रातून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून कार्यकारी अभियंत्यांनी सुमारे ७२ अभियंत्यांच्या नावे व त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या मोजमाप पुस्तिकांचे क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. दहा दिवसांत सदरच्या पुस्तिका जमा न केल्यास संबंधित कामांची देयके अदा न करण्याची तसेच त्या पुस्तिका गायब झाल्याची पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडला असल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, मुळात सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे टक्केवारीने चालतात हे आजवर लपून राहिलेले नाही, त्यामुळे काम झटपट पूर्ण करण्याकडे जसा ठेकेदाराचा कल असतो, तसाच त्या कामाचे नियंत्रण करणाºया अधिकाºयालाही काम हातावेगळे करण्याची घाई झालेली असते. मुळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम करणारे ठेकेदारच अधिकाºयांऐवजी मोजमाप पुस्तिका हाताळत असतात व तेच या पुस्तिकेच्या आधारे कामाचे देयक तयार करीत असतात. अधिकाºयाची स्वाक्षरी घेतल्यानंतर देयकासाठी मोजमाप पुस्तिका सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्यालयात सादर केली जाते. काम केलेले असल्यामुळे ठेकेदाराला बिलासाठी घाई असल्याने तो कोणत्याही परिस्थितीत मोजमाप पुस्तिका स्वत:जवळ ठेवू शकत नाही, तर अधिकाºयांचाही त्यात ‘रस’ असल्याने त्यांच्याकडूनही विलंब होण्याची शक्यता नसते.असा असतो मोजमाप पुस्तिकेचा प्रवासकाम पूर्ण झाल्याचे देयक तयार झाल्यावर मोजमाप पुस्तिका सर्वात प्रथम प्रोजेक्ट आॅफिसरकडे तपासणीकडे जाते तेथून अंतर्गत लेखा परीक्षकाकडून त्याची छाननी होते. पुढे कोणत्या हेडवर पैसे शिल्लक आहेत, त्या हेडकडे मोजमाप पुस्तिकेचा प्रवास सरकतो, त्याची स्वाक्षरी झाल्यावर कार्यकारी अभियंत्याच्या स्वीय सहायकाकडे दिले जाते, त्यांची खात्री झाल्यावर वरिष्ठ लेखापाल या पुस्तिकेची तपासणी करतात, तेथून कार्यकारी अभियंत्यांकडे अंतिम स्वाक्षरीसाठी पुस्तिका गेल्यानंतर त्यांची स्वाक्षरी होते व पुढे देयकाची रक्कम काढण्यासाठी स्लीप काउंटरवर पुस्तिकेचा प्रवास संपुष्टात येतो. अधिकाºयांकडून खंडनसार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाच्या मोजमाप पुस्तिकांचा थेट संबंध संबंधित काम करणाºया अधिकाºयाशी असला तरी, ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर देयक तयार झाल्यावर ते मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविले जाते व त्यानंतर अधिकाºयाची जबाबदारी संपुष्टात येते. ज्या अधिकाºयांकडे आता मोजमाप पुस्तिकांची मागणी केली जात आहे, त्यातील अनेक अधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करून अन्यत्र बदलून गेले आहेत. त्यामुळे आता त्या मोजमाप पुस्तिका कोठून शोधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.