लोहोणेर : देवळा परिसरात साथींचे आजार रोखण्याच्या उद्देशाने देवळा नगरपंचायत व लोहोणेर आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोलथी नदीपात्रात गप्पी मासे सोडण्यातआले. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक साथींचे आजार उद्भवू शकतात तसेच हिवताप, डेंग्यूसारखे आजार डासांमुळे अतिक्रमण करतात. डासांचे आक्र मण रोखण्यासाठी व डासांची अंडी, अळी, कोश या तीन अवस्था पाण्यात होत असल्याने गप्पी मासे त्यांना पाण्यातच संपविण्याचे काम करीत असल्याने डासांची वाढ मर्यादित राहते म्हणून लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्र व देवळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथील कोलथी नदीपात्रात गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अशोक अहेर, बांधकाम सभापती लक्ष्मीकांत अहेर, युवानेते संभाजी अहेर, नगरसेवक डॉ. प्रशांत निकम, लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार, नियोजन सभापती अतुल पवार, पाणीपुरवठा सभापती प्रदीप अहेर, नगरसेवक बाळासाहेब अहेर, आरोग्य पर्यवेक्षक डी. पी. पवार, आरोग्य सहायक व्ही. एच. परदेशी, आरोग्य सेवक सतीश अहिरराव, दिलीप निकम, विलास पगार, भिका पवार, संभाजी शेजवळ आदिंसह नागरिक उपस्थित होते.
साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना
By admin | Published: August 26, 2016 12:13 AM