शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

उपाययोजना : समुपदेशक करणार कर्मचाºयांचे प्रबोधन एसटी कर्मचारी तणावात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:51 AM

नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावनामहामंडळात अंतर्गत बरीच धुसफूस

नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे. सध्या एसटी कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न तसेच काही विभाग बंद करण्याच्या निर्णयामुळे कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना आली असल्याने त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी महामंडळाला समुपदेशकाची गरज भासू लागली असल्याची चर्चा महामंडळात सुरू आहे.राज्य परिवहन महामंडळातील सध्याचे वातावरण अस्थिरतेचे असून, वेतनाच्या प्रश्नापासून ते खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या रेट्यामुळे कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. एकीकडे कोट्यवधीचे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत, तर दुसरीकडे कर्मचाºयांची भरती आणि वेतनाच्या मुद्द्यावरून सरकारकडून ठोस भूमिका जाहीर केली जात नाही. त्यामुळे सध्या महामंडळात अंतर्गत बरीच धुसफूस असल्याने सारे वातावरणच गढूळ झाले आहे. कर्मचाºयांच्या आपसातील कुरबुरी, ड्यूटीचा टाइम, ड्यूटी मिळणे न मिळणे, इन्क्रिमेंट, सुटी, बदल्या आणि वेतन अशा अनेक बाबतीत कर्मचाºयांमध्ये काहीसा असंतोष आहे. कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. महामंडळाच्या अनाकलनिय निर्णयांमुळे एकीकडे कर्मचारी गोंधळलेले असतानाच महामंडळाने कर्मचाºयांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचारी तणावात असल्याच्या मुद्द्याला पुष्टी मिळाल्याचा दावा कर्मचारी वर्गाकडून केला जात आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताणतणावाचे निराकरण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून, अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे तसेच आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचारासाठी गरज निदर्शनास आणून देण्यासाठी समुपदेशकांना मानद स्वरूपात नेमणूक दिली जाणार आहे. कर्मचाºयांना ताणतणावातून बाहेर काढण्यासाठी महामंडळाने एक वर्षासाठी समुपदेशक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. मानद तत्त्वावर सदर नेमणूक केली जाणार असल्याने त्यानंतर त्यांची नेमणूक पुढे करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. समुपदेशकांना मासिक चार हजार रुपये इतके मानधन देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समुपदेशकांनी प्रत्येक आगारात महिन्यातून किमान तीन वेळेला भेट देऊन कर्मचाºयांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला आहे. ही केवळ मानद सेवा असल्याने संबंधितांना केवळ मानधनच दिले जाणार आहे.महिला कर्मचाºयांना मिळेल सुरक्षाराज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचा प्रकार जळगाव येथे नुकताच समोर आला आहे. एस.टी.च्या एका कर्मचाºयाने कंडक्टर महिलेची छेड काढून तिला अश्लील लघुसंदेश पाठविले आणि हात धरण्याचाही प्रयत्न केल्याप्रकरणी त्या कर्मचाºयाला शिवसेनेच्या महिला शाखेने चांगलाच चोप दिला होता. या घटनेचे वृत्त एस.टी. कर्मचाºयांच्या भ्रमणध्वनीवर आल्यानंतर अनेकांनी स्थानिक पातळीवरील प्रकाराला आळा घालण्यासाठी समुपदेशन चांगला पर्याय ठरू शकेल असे मत खासगीत व्यक्त केलेच; शिवाय महिलांना संबंधित समुपदेशकाकडे जाऊन होणारा मानसिक त्रास सांगणे सोपे होणार असल्याने महिलांच्या सुरक्षितेतासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत महिला कर्मचाºयांनी व्यक्त केले. राज्यातील सर्व विभागांमध्ये मानद तत्त्वावर समुपदेशकाची नेमणूक करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य या विषयावरील पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी बंधनकारक आहे. किंवा मानसशास्त्र विषय घेऊन पदवी पूर्ण करणाºयांनाही अर्ज करण्याची संधी आहे. समुपदेशकाला केवळ मानधन ४००० रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला आगारात कर्मचाºयांशी संपर्कात रहावे लागणार आहे. आगारात महिन्यातून तीनवेळेस भेटी देणे बंधनकारक आहे. निमित्त काहीही असले तरी कर्मचाºयांना मानसिक सक्षम करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी समुपदेशकाची गरज एस.टी. महामंडळाला वाटल्याने या निर्णयामुळे कर्मचारी कितपत सक्षम, समजदार आणि दक्ष होतात याकडे महामंडळाचे लक्ष नक्कीच असणार आहे.