नाशिक : काळानुरूप जागतिक पर्यटनाचा विस्तार होत गेला. आधुनिकतेच्या काळात जग जवळ आले असून, पर्यटनाला मोठा वाव मिळत आहे. प्रवासाकरिता सुलभ साधने उपलब्ध झाली आणि माध्यमांच्या गतिमान प्रगतीमुळे पर्यटनवृद्धीला मोठा हातभार लागला. पर्यटनाविषयीची आवड जनसामान्यांमध्ये अधिकाधिक निर्माण करण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले. त्यामुळे जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना मिळत गेली, असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक सुधीर पाटील यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या व्याख्यानमालेत रविवारी (दि.२) ‘जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी’ याविषयावर पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतकार रविराज गंधे यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून पाटील यांचा जीवनप्रवासापासून जागतिक स्तरावर पर्यटनाला मिळणारा वावपर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले, जगभ्रमंती केल्यानंतर सर्वाधिक सुरक्षित व चांगला देश केवळ भारत आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहचलो. पर्यटनाला भारतात मोठा वाव आहे, यात शंका नाही. दुर्दैव एवढेच की पर्यटन क्षेत्राकडे भारतात अद्याप औद्योगिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. लेह-लडाखचाही त्यांनी उल्लेख करत येथील निसर्गसौंदर्य, डोंगरदऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य अद्भूत असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर पर्यटनवाढीचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे विविध खेळांच्या होणाºया स्पर्धांचे आयोजन हेदेखील आहे. कारण जगाच्या कानाकोपºयात क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत विविध खेळांचे चाहते आहे. त्यामुळे अशा खेळांच्या होणाºया स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी ते चाहते पर्यटन करत असतात, असे पाटील म्हणाले. यावेळी लेह-लडाखची लघुचित्रफितही दाखविण्यात आली.पंधरवड्यात केरळचे पर्यटन होईल सुरळीतपर्यटनावरच केरळचे सरकार अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही. पुरामुळे पर्यटनाला मोठा फटका जरी बसला असला तरी येत्या पंधरवड्यात कोच्ची ते त्रिवेंद्रमपर्यंतचे केरळचे पर्यटन सुरळीत झाल्याचे आपल्याला पहावयास मिळेल, कारण तेथे प्रत्येक व्यक्ती एकत्र येऊन त्यासाठी झटत आहे, असेही पाटील यांनी यावेळी अधोरेखित केले. भारतात चांगल्या, सुंदर, सुरक्षित नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ म्हणजे केरळ आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.
जागतिक पर्यटनवाढीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची : सुधीर पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 8:58 PM
‘लेखक तुमच्या भेटीला’ या व्याख्यानमालेत रविवारी (दि.२) ‘जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी’ याविषयावर पाटील यांची मुलाखत घेण्यात आली.
ठळक मुद्देपंधरवड्यात केरळचे पर्यटन होईल सुरळीत सुरक्षित नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटनस्थळ म्हणजे केरळ