लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : मालेगाव येथे कर्तव्यास असलेल्या व येथील रहिवासी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटव्ह आल्याने या रूग्णाचे अतिनिकट संपर्कातील ११ तर कमी संपर्कातील ४० जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.या रुग्णाच्या पाच नातेवाइकांना येवला येथील कोरोना कोविड १९ या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ६९०० व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले व विंचूर येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.आर. जाधव यांनी दिली.रुग्णाच्या घराजवळील भागात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांची विंचूर येथील कोरोनाग्रस्त रुग्णामुळे पुढील कार्यवाहीसाठी इिन्सडन्स आॅफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. निफाड प्रांत डॉ. पठारे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.