सटाणा : येथील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने इतर प्रमुख अधिकाऱ्यांचेही विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत उपाययोजना करण्यात येत आहे.प्रशासनाने तत्काळ संपर्कात आलेल्या सटाणा व ताहाराबाद येथील सतरा जणांना येथील विलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, दक्षता म्हणून बागलाणच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांनीदेखील स्वत:च्या निवासस्थानी त्यांनी विलगीकरण करून घेतले आहे.प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकाºयाचे ते सहाय्यक म्हणून येथील बागलाण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात हे वैद्यकीय अधिकारी कामकाज पाहत होते. तालुक्यातील कोरोनाच्या संबंधित पथकात त्यांचा समावेश असल्याने संपूर्ण यंत्रणाच धास्तावली आहे. गेल्या आठवड्यात वैद्यकीय अधिकाºयाला त्रास जाणवू लागल्याने त्यांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. रविवारी सायंकाळी त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्याच्यात ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी हादरले असून, प्रशासनाने त्या वैद्यकीय अधिकाºयाच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी अशा नऊ जणांना येथील नामपूर रस्त्यावरील वसतिगृहात त्यांना विलगीकरण केले आहे, तर ताहाराबाद येथील त्या वैद्यकीय अधिकाºयांच्या निवास-स्थानातील आठ जणांना त्यांच्या निवासस्थानातच विलगीकरण करण्यात आल्याचे प्रांत विजयकुमार भांगरे यांनी सांगितले.दरम्यान, वैद्यकीय सूत्रांनी या सतरा जणांचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे.--------------------------------------------पीपीई किट्स, मास्क गेले कुठे?बागलाणच्या आरोग्य यंत्रणेसाठी गेल्या महिन्यापूर्वी शासनाने पीपीई किट्स आणि आरोग्य विभागाने प्रमाणित केलेले मास्क पुरवण्यात आले होते. नामपूर येथील वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित आढळल्याने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून या साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान, अजमीर सौंदाणे येथील शासकीय शाळेत विलगीकरण करण्यात आलेल्यांसाठीदेखील मास्क पुरवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणालाही त्याचे वाटप न केल्यामुळे यंत्रणा संशयाच्या भोवºयात सापडली आहे जर आरोग्य विभागाने पुरवलेल्या किट्स त्या वैद्यकीय अधिकाºयाला मिळाले असते तर आज त्यांना या भयंकर आजाराची बाधा झाली नसती, असे उघडपणे बोलले जात आहे.------------------------------प्रतिबंधित क्षेत्रातगर्दीच गर्दी...शहरात गेल्या आठवड्यात दोन कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याने संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता ताहाराबाद गावदेखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र तरीदेखील सटाणा शहरात आज सोमवारी संपूर्ण शहरातील दुकाने खुली केल्याने सकाळपासून गर्दीच गर्दी बघायला मिळाली. या गर्दीमुळे संचारबंदीचे उलंघन तर झालेच; परंतु बाहेरगावाहून आलेल्या आंबे विक्रे त्यांच्या शिरकावामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
वैद्यकीय अधिकारीच कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:53 PM