नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उद्दिष्टांची पूर्तता न करणाºया तसेच कमी काम असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी फटकारले आहे. तसेच किरकोळ रजा वगळता सर्व अधिकार काढून जिल्हा स्तरावर घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. असमाधानकारक काम असलेल्या येवला व निफाड येथील तालुका वैद्यकीय अधिकाºयांना नोटिसा बजावण्याचे आदेश आरोग्य विभागाला यावेळी देण्यात आले.आरोग्य विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी (दि. १४) राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध आरोग्यविषयक योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. आरोग्य विभागाची मागील महिन्यात झालेली आढावा बैठक अपूर्ण माहिती दिल्याने डॉ. गिते यांनी रद्द केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. सुरुवातीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. डॉ. गिते यांनी मूल्यांकनाप्रमाणे आढावा घेताना कामात कसूर करणाºया अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरीत वस्तुस्थिती सांगण्याबाबत सूचना करतानाच काम कधी पूर्ण करणार, याबाबत लेखी आश्वासनही लिहून घेण्यात आले.तालुका स्तरावर गटविकास अधिकाºयांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करून कामात दिरंगाई करणाºया कर्मचाºयांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी तालुका वैद्यकीय अधिकाºयांना दिले. दरम्यान, लसीकरण मोहीम, कुटुंब कल्याण कार्यक्र म, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.
कामात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाºयांना फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:15 AM