नाशिक : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि रु ग्ण यांचे नाते फार महत्वाचे आहे. यामध्ये दोघांनीही जबाबदारीने त्याचे पालन केले पाहिजे. डॉक्टरांवर होणारे हल्ले नक्कीच खेदजनक आणि निषेधार्ह आहे. सदरचे चित्र बदलण्यासाठी रु ग्ण समुपदेशन होणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तत्वनिष्ठेचे महत्त्व पटवून घेणे देखील महत्वाचे आहे. यासाठी वैद्यकीय संघटनाहंनी त्यांच्या स्तरावर एक कार्यशक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे मत अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. भरत केळकर यांनी व्यक्त केले.‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ निमित्त नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) नाशिकच्या जिल्हा शाखेतर्फे‘डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांवर ‘एक चिंतन’’ या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या सुरु वातीला निमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी डॉक्टरांवरील होणा-या हल्ल्यांसंबंधी विवेचन केले. आजही वैद्यकीय व्यवसाय हा एक उदात्त व्यवसाय म्हणून समजला जातो. त्यामुळे या दिवसाचे महत्व ठेवून रु ग्ण व डॉक्टर यामधील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशानेच हा दिवस साजरा करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात डॉक्टर व रु ग्ण यामधील नाते अधिक सजग होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. भरत केळकर यांनी रु ग्ण समुपदेशन, तत्वनिष्ठता या गोष्टींचे महत्व सांगताना डॉक्टरांच्या सामुहिक जबाबदारीचेही महत्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आपले वैद्यकीय व्यवसायातले चांगले आणि वाईट अनुभव कथन केले. सोबतच रु ग्ण आणि डॉक्टर यांचे नाते अधिक दृढ अनेक सुचना नमुद केल्या. यावेळी डॉ.शैलेश निकम, डॉ.भूषण वाणी, डॉ.तुषार सूर्यवंशी, डॉ.अनिल निकम, डॉ.देवेंद्र बच्छाव, डॉ.श्रुती कुलकर्णी, खजिनदार डॉ.प्रतिभा वाघ, डॉ.मनिष हिरे, निमा वुमन्स फोरम अध्यक्ष डॉ. प्रणिता गुजराथी, वरिष्ठ सदस्य डॉ.शरद पाटील, डॉ.अनय ठिगळे, डॉ.सुहास कुलकर्णी, डॉ.मोहन टेंभे आदी उपस्थित होते. डॉ. दीप्ती बढे यांनी सूत्रसंचलन केले.
वैद्यकीय संघटनांनी कार्यशक्ती निर्माण करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 5:34 PM
भरत केळकर : डॉक्टर्स डे निमित्त कार्यक्रमात प्रतिपादन
ठळक मुद्दे‘डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांवर ‘एक चिंतन’’ या विषयावर बैठकीचे आयोजन