नाशिक : माणसाचे एकूणच आरोग्यात मुखआरोग्य विशेष महत्त्वाचे आहे. दंत विद्याशाखेमध्ये संशोधनासाठी व्यापक संधी आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दंत विद्याशाखेच्या पहिल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, महात्मा गांधी विद्यामंदिर, केबीएच दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भावसार उपस्थित होते. यावेळी कुलगुरू म्हणाले, दंत विद्याशाखेत मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधनाला चालना मिळणेसाठी तसेच यासाठी संशोधकांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रमाणीकरण करून त्याचा अवलंब होणे गरजेचे आहे. या राज्यस्तरीय दंत परिषदेत दंत विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. विद्यार्थी व दंत महाविद्यालयातील शिक्षक संशोधक सहभागी झाले होते. या परिषदेत महात्मा गांधी दंत महाविद्यालयाचे डॉ. अमित नेहते, डॉ. तृप्ती काळे, संगमनेर येथील एसएमबीटी दंत महाविद्यालयाचे डॉ. शैलेंद्रसिंग, डॉ. सुयोग तुपसाखरे, धुळे येथील एसीपीएम दंत महाविद्यालयाचे डॉ. अरुण दोडामणी, धामणगाव येथील एसएमबीटी दंत महाविद्यालयाचे डॉ. किरण जगताप, हिंगोली येथील डॉ. हेडगेवार दंत महाविद्यालयाचे डॉ. दिलीप धामणकर हे परीक्षक होते.पारितोषिक विजेते संशोधक पदवी गटातील नागपूरच्या एस.डी.के.एस. दंत महाविद्यालयाचे एकनुर गुलाटी यांना प्रथम क्रमांक, खारघरच्या वाय.एम.टी. येरला दंत महाविद्यालयाची सनप्रित सचदेव हिला द्वितीय क्रमांक तर खारघरच्या वाय.एम.टी. येरला दंत महाविद्यालयाचीच हेरा होवेवाका हिला तृतीय क्रमांक मिळाला. पदव्युत्तर विद्यार्थी गटात मुंबईच्या नायर दंत महाविद्यालयाची नेहा अग्रवाल, नागपूरच्या एस.डी.के.एस. दंत महाविद्यालयाची वैशाली अग्रवाल यांना अनुक्र मे प्रथम, द्वितीय तर नाशिकच्या के.बी.एच. दंत महाविद्यालयाच्या अलीजा मामाजीवाला हिला तृतीय क्रमांक मिळाला. पीएच.डी. विद्यार्थी व शिक्षक गटात पुण्याच्या सिंहगड दंत महाविद्यालयाची केतकी भोर हिला प्रथम, सोलापूरच्या पीडीव्ही दंत महाविद्यालयाचा अभय कुलकर्णी यास द्वितीय, सांगलीच्या व्ही.पी.डी.सी. दंत महाविद्यालयाचा अनिलकुमार बिरादर यास तृतीय क्रमांक तर नागपूरच्या एस.डी.के.एस. दंत महाविद्यालयाचा अखिलेश शेवाळे चतुर्थ क्रमांकाने विजेते झाले.
दंत विद्याशाखेत संशोधनासाठी व्यापक संधी आरोग्य विद्यापीठ : परिषदेच्या समारोपप्रसंगी म्हैसेकर यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:53 AM
नाशिक : माणसाचे एकूणच आरोग्यात मुखआरोग्य विशेष महत्त्वाचे आहे. दंत विद्याशाखेमध्ये संशोधनासाठी व्यापक संधी आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.
ठळक मुद्देदंत विद्याशाखेत मोठ्या प्रमाणात संशोधन संशोधकांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रमाणीकरण