तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत वैद्यकीय सेवा दिली जाते. या ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका-यांना मार्च २०१८ पर्यंत मानधन अदा केले गेले आहे. मात्र गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २०१८ पर्यंत सहा महिन्यांचे मानधन रखडले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांनाही निवेदन देऊन तक्रार करण्यात आली होती. मात्र दखल घेण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकाºयांना मानधन मिळत नसल्याने आर्थिक व मानसिक हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर १ आॅक्टोबर पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात हर्षला कदम, अमोल दिप्ते, विलास सनेर, प्रतिभा थोरात, मृणाली पाटील आदिंसह वैद्यकीय अधिकाºयांनी सहभाग घेतला आहे.
आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 5:30 PM