येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक रूपाली पाटोळे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. यात सरपंचपदासाठी मीरा पालवे व उपरसरपंचपदासाठी रमेश मचकुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निर्धारित वेळेत दोन्ही पदांसाठी एकेक अर्ज आल्याने सरपंचपदी पालवे तर उपसरपंचपदी मचकुले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा कासार यांनी केली. बैठकीस सुकदेव राजाराम पालवे, जयश्री काळुराम पालवे, जिजाबाई शांताराम पालवे, हिरा मोहन साबळे, ज्ञानेश्वर निवृत्ती आव्हाड आदींसह सुभाष आव्हाड, काळुराम पालवे, नामदेव पालवे, शांताराम पालवे, रंगनाथ पालवे, कचूनाना पालवे, भास्कर पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०२ दत्तनगर सरपंच
सिन्नर तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीरा पालवे तर उपसरपंचपदी रमेश मचकुले यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी जल्लोष करताना ग्रामस्थ.
===Photopath===
020321\02nsk_7_02032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ दत्तनगर सरपंच सिन्नर तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीरा पालवे तर उपसरपंचपदी रमेश मचकुले यांची बिनविरोध झाली. त्याप्रसंगी जल्लोष करताना ग्रामस्थ.