नाशिक : शिवसेनेच्या गटबाजीमुळे झालेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विनायक पांडे यांचे म्हणणे जाणून घेतले. दुसरीकडे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनीही नााशिकमध्ये येऊन मारहाण झालेल्या अजय बोरस्ते यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या प्रकारामुळे नेत्यांची नक्की काय भूमिका, याकडे लक्ष लागून आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून माजी महापौर विनायक पांडे आणि महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यात संघर्ष झाला. त्याची परिणिती म्हणजे पांडे समर्थकांनी बोरस्ते यांना मारहाण केली होती. या घटनेची दखल घेऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक पांडे यांना मुंबईला पाचारण करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. बोरस्ते यांच्याविषयीची नाराजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे सांगण्यात आले. आपले म्हणणे ऐकून घेतल्याने पांडे हे समाधानी झाले. दरम्यान, सोमवारी नाशिकमध्ये आलेले शिवसेनेचे सचिव अनिल देसाई हे अजय बोरस्ते यांच्या भेटीला गेले आणि त्यांना दिलासा दिला. त्यामुळे शिवसेनेची नक्की भूमिका काय, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
सेनेच्या नेत्यांची मखलाशी, पांडेंबरोबरच बोरस्ते यांची भेट
By admin | Published: February 07, 2017 12:41 AM