मालेगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात बैठक झाली. दोन हेक्टरपेक्षा क्षेत्र कमी असलेल्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या त्रिसदस्यीय समिती गठित करून याद्या तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधीसाठी जिल्हा पातळीवरून तहसील कार्यालयाला शेतकºयांची यादी तयार करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालयात बुधवारी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आदींची संयुक्त बैठक झाली.या बैठकीत २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या अल्प भूधारक शेतकºयांची यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकºयांना ६ हजार रुपये वार्षिक निधी दिला जाणार आहे.
किसान सन्मान योजनेबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 1:14 AM
मालेगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात बैठक झाली. दोन हेक्टरपेक्षा क्षेत्र कमी असलेल्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या त्रिसदस्यीय समिती गठित करून याद्या तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देपात्र शेतकºयांना ६ हजार रुपये वार्षिक निधी दिला जाणार