नाशिक : विधानसभा निवडणूक भाजप-सेनेने महायुती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीने आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेऊन एकसंघ राहण्याच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी, प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात महायुती व आघाडीतील समाविष्ट पक्षांनी फक्त आपापल्या पक्षाच्याच उमेदवारांच्या प्रचारावर भर देण्यास सुरुवात केली असून, नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघाच्या कडेकडेने प्रचार सभा घेऊन मित्रपक्षांच्या उमेदवारांना वाºयावर सोडले आहे.विधानसभा निवडणुकीच्या घोेषणेपूर्वीच राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला व त्यात समविचारी पक्षांनाही सामावून घेतले. जागावाटपात दोन्ही पक्षांनी समान जागा घेऊन मित्रपक्षांना जागा सोडल्या. ज्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार नसेल तेथे मित्रपक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला जाईल, अशी भूमिका आघाडीने घेतली, तर तोच फॉर्म्युला भाजप-सेना युतीने उचलला; मात्र कॉँग्रेस आघाडीपेक्षाही युतीच्या उमेदवारांमध्ये जागोजागी बंडखोरीचे प्रमाण अधिक असून, मित्रपक्षासमोरच बंडखोरी करून अधिकृत उमेदवाराची निवडणूक धोक्यात आणण्याचे प्रकार राज्यात ठिकठिकाणी घडले आहेत.युतीच्या उमेदवारांमध्ये स्थानिक पातळीवर बेबनाव निर्माण झालेले असताना अशा परिस्थितीत राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार सभांचे नियोजन करणेही अवघड होऊन बसले आहे. जागावाटपात आपल्या पक्षाला जी जागा सुटली त्या त्या मतदारसंघातच राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.कॉँग्रेस आघाडीची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्वपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन वातावरण निर्मितीला हातभार लावला असून, त्यांच्या पाठोपाठ आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील ग्रामीण व शहरी भागात रोड शो केला आहे.आठवलेंकडून भाजपचाच प्रचारकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभादेखील नाशिक पश्चिम मतदारसंघातच घेण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येत असली तरी या मतदारसंघात सेनेने बंडखोरी केली असल्याने सेना उमेदवारांच्या समर्थकांनी रामदास आठवले सेनेच्या प्रचारासाठी आल्याचा दावा केला आहे.शनिवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर आलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निफाड, नांदगाव व येवला या तीन शिवसेनेच्या मतदारसंघात जाहीर सभा घेऊन आजूबाजूच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे युतीचा मुख्यमंत्री होईल, असा एकीकडे दावा केला जात असताना दोन्ही पक्षांकडून मात्र मित्रपक्षाच्या उमेदवाराला वाºयावर सोडले जात असल्याचे चित्र आहे.
पक्षांच्या कडेकडेने जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:03 AM
विधानसभा निवडणूक भाजप-सेनेने महायुती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीने आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेऊन एकसंघ राहण्याच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी, प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात महायुती व आघाडीतील समाविष्ट पक्षांनी फक्त आपापल्या पक्षाच्याच उमेदवारांच्या प्रचारावर भर देण्यास सुरुवात केली
ठळक मुद्देयुती, आघाडीकडून मित्रपक्षांचे उमेदवार वाऱ्यावर