मालेगाव : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान नगर पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधीबाबत मालेगाव महानगरपालिका सभागृहात बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्वयंरोजगार बाबत बैठकीत उपायुक्त (विकास) यांनी बँक अधिकारी यांच्याशी पीएम स्वनिधी उद्दिष्टपूर्ती बाबत चर्चा करण्यात आली.सर्व बँक अधिकारी यांनी येत्या महिन्या भरात आलेल्या प्रकरणाचा मंजुरी देऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच आजपर्यंत एकूण ३ हजार ६६४ अर्ज दाखल आहेत. त्यातील काही प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तर बँकेकडे एकूण २ हजार ६६२ अर्ज गेले आहेत. त्यापैकी ६६८ प्रकरणे मंजुरीच्या प्रक्रि येत आहेत. तरी याबाबत उद्दिष्टपूर्ती बाबत बँकांची संवाद साधून शंभर टक्के योजना सफल सूचना देण्यात आल्यात. त्यास बँकांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी प्रभाग कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी केले.बैठकीत उपायुक्त रोहीदास दोरकुळकर, शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर, शहरातील सर्व बँक शाखा अधिकारी, फोन पे चे व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी आदी उपस्थित होते.
पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधी सुविधा बाबत बँकासोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 4:37 PM
मालेगाव : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान नगर पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधीबाबत मालेगाव महानगरपालिका सभागृहात बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्वयंरोजगार बाबत बैठकीत उपायुक्त (विकास) यांनी बँक अधिकारी यांच्याशी पीएम स्वनिधी उद्दिष्टपूर्ती बाबत चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्देयेत्या महिन्या भरात आलेल्या प्रकरणाचा मंजुरी देऊ असे आश्वासन दिले