निफाड : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने मंगळवारी निफाड प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.बैठकीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तमकडलग, गटविकास अधिकारी संदीप कराड, अतिरिक्त सहायकनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक पाटील, आदींसह अधिकारी राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी सांगितले निवडणूक काळात आचारसंहितेचे राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांनी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळात सर्व प्रकारच्या सभांना सर्व पक्षांना समान संधी दिली जाईल. त्यासाठी प्रथम परवानगी मागणाऱ्या पक्षाला प्रथम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही खासगी व्यक्तीच्या घरावर बॅनर लावताना त्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र, बिल्ले द्यावेत, मतदारांना ओळख चिठ्ठी देताना साध्या पांढऱ्या कागदावर द्याव्या, त्या चिठ्ठीवर उमेदवाराचे नाव, पक्षाचे चिन्ह, असू नये.पोलीस उपाधीक्षक माधव पाटील यांनी प्रचारासाठी रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही असे सांगितले. याप्रसंगी माधव पडिले, उत्तम कडलग, दीपक पाटील यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी निफाड, ओझर, पिंपळगाव बसवंत, सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
निफाडला आचारसंहितेसंदर्भात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:45 AM
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने मंगळवारी निफाड प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
ठळक मुद्देसूचना : राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांना ओळखपत्र द्यावे