नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री म्हाळोबा महाराज यात्रेस माघ पौर्णिमेस प्रारंभ होणार असल्याने यात्रा नियोजनाच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी मार्गदर्शन केले.. व्यासपीठावर पोलीसपाटील सुदाम आव्हाड, कारभारी शिंदे, मारुती शिंदे, प्रकाश उंबरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यात्रा समितीने ग्रामीण रुग्णालय, वीज वितरण कंपनी, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना प्रशासकीय उपाययोजनेच्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीस पाराजी शिंदे, जानकू शिंदे, कारभारी शिंदे, बापू शिंदे, सुभाष शिंदे, माधव शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब शिंदे, भीमा शिंदे, रायभान शिंदे, लक्ष्मण शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.चौकट - बारा जणांची समितीम्हाळोबा मंदिरासह यात्रा भरविण्यात येते ती जागा खासगी मालकीची आहे. गावातील धनगर समाजबांधवांकडे मंदिराची व्यवस्था आहे. सध्या म्हाळोबा मंदिराच्या जागेवरून व यात्रा काळात मंदिराला मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरून दोन गटात वाद सुरू आहेत. सदर वादाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांची बैठक घेऊन सर्वानुमते १२ लोकांची यात्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर यात्रा काळात जमिनीचे वाद दूर ठेवून यात्रा शांततेत पार पाडावी याबाबत बोरसे यांनी लोकांना आवाहन केले.चौकट - यात्राकाळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी.म्हाळोबा महाराज नवसाला पावणारे महाराज मानले जात असल्याने यात्रा काळात येथे मोठी गर्दी होते. यात्रा काळात सदरच्या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. म्हाळोबा महाराज यात्रोत्सव १७ ते २० फेब्रुवारी या काळात होणार आहे. दोडी बुद्रुक ते म्हाळोबा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे या खड्ड्यांची संबंधित विभागाने यात्रेपूर्वी दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींना मुबलक पाणी नाही. यात्रा काळात भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने ३ दिवस दररोज ५ खेपांद्वारे पाणीपुरवठा करावा. रस्त्याची दुरुस्ती व पाण्याचे टॅँकर सुरू करण्यासंदर्भात सरपंच मीना आव्हाड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
म्हाळोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोडी येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 4:19 PM
नांदूरशिंगोटे : श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. जुन्या रुढी, परंपरा दिवसेंदिवस कमी होत असून, त्यादृष्टीने येथील यात्रा समितीने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
ठळक मुद्देयात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने पंचायत समिती स्तरावरून यात्रा काळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.