नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे नुकतीच शेतकºयांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. गरज पडल्यास नाशिक जिल्ह्यातील दोन खासदार तसेच महसूलमंत्री यांच्याशी दिल्लीत जाऊन भूसंपादनाबाबतचा प्रश्न सोडवू तालुक्यातील शेतकºयांना कदापी भूमिहीन होऊ देणार नसल्याचे आश्वासन यावेळी पाडळी देशमुख येथील शेतकºयांच्या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी दिले.अनेक वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प झाले यामध्ये धरण, रेल्वे, औद्योगिक वसाहत, महामार्ग, रस्ते अशा विविध प्रकल्पासांठी शासनाने जमिनी संपादित केल्या असून समृद्धी महामार्गासाठी देखील हजारो हेक्टर जमीन संपादित केली आहे. आणि आता पुन्हा नवीन रेल्वे लाईनच्या रु ंदीकरण कामासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित करणार असल्याने हा रेल्वे प्रकल्प म्हणजे शेतकºयांवर मोठा अन्याय होणार आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील घोटी, माणकिखांब, मुंढेगाव, मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, नांदूरवैद्य, अस्वली हि गावे प्रकल्पबाधित होणार आहे. या प्रकल्पाला शेतकºयांचा विरोध आहे.यावेळी माजी आमदार मेंगाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, कमलाकर नाठे, दशरथ मालुंजकर, भाऊसाहेब धोंडगे, तसेच तालुक्यातील सरपंच व अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण विरोध जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 5:05 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे नुकतीच शेतकºयांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
ठळक मुद्देया प्रकल्पाला शेतकºयांचा विरोध आहे.