नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला असताना यंदा मात्र गाळ काढण्याच्या कामांची संख्या अतिशय कमी असल्याने येणाºया कालावधीत अधिकाधिक गाळ काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाºयांनी घेतला. त्यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना मिळालेली मंजुरी, प्रत्यक्ष सुरू झालेली कामे व प्रशासकीय मान्यतेअभावी पडून असलेल्या प्रस्तावांची माहिती जाणून घेतली. यंदा शासनाने पाणी साठवणुकीसाठी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात प्राधान्य देण्याचे ठरविले असल्यामुळे गाळ काढण्याची कामे या योजनेंतर्गत हाती घेण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्तावांची मागणी करून त्यांना प्रांतांनी तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम पूर्ण व्हावेत, असे सांगून जिल्हाधिकाºयांनी किमान ३६ लाख घनमीटर इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट अधिकाºयांना दिले.यावेळी मागेल त्याला शेततळे या योजनेचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे उपअभियंते उपस्थित होते.
बैठक : मागेल त्याला शेततळ्याचे उद्दिष्ट अपूर्ण गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:55 AM
नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला.
ठळक मुद्देप्रस्तावांची माहिती जाणून घेतलीशेततळे योजनेचाही आढावा