मुखेड : येवला तालुक्याचे आमदार छगन भुजबळ मागील दीड वर्षापासून अटकेत असून, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जात असल्याच्या आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चाचे सोमवारी (दि. १६) आयोजन करण्यात आले आहे. मानोरी बुद्रुक, ता. येवला येथे या मोर्चाचे रणशिंग फुंकण्यात आले. भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतर येवला तालुक्याच्या विकासाचा वेग पूर्णपणे मंदावला असून, कोणत्याच प्रकारची कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. रस्त्यात खड्डे, बंधारे कोरडे, पिके पाण्याअभावी करपणे अशा अनेक कामांची वानवा झाल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब लोखंडे, तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, नाना लोंढे, येवला-लासलगाव रा.कॉँ. मतदार संघाचे अध्यक्ष वसंत पवार, माजी सभापती प्रकाश वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ काळे, दराडे, सोसायटी अध्यक्ष नंदाराम शेळके, रोहन वावधाने, देवराम शेळके, शांताराम शेळके, पंढरीनाथ शेळके, तुकाराम शेळके, अमोल शेळके, सूर्यभान तिपायले, दिनकर वावधाने, जगन शेळके, लक्ष्मण वाघ, सचिन वावधाने, बाळासाहेब वावधाने, बाबासाहेब तिपायले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानोरीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:07 AM