नाशिक : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.५) दुपारी २ वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी मूल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, २०१२ व २०१३ पासूनच्या शिक्षकांना नियुक्त मान्यता व वेतन द्यावे, २००३ ते२०११ पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देऊन त्यांच्यासाठी वेतनाची आर्थिक तरतूद करावी, तसेच २०११ पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी. अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कारास्त्र उपसले आहे. बारावीची परीक्षा दि.२१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, पाच प्रमुख विषयांचे पेपर होऊनही शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम हाती घेतलेले नाही.
मंत्रालयात बैठक : अन्य मुद्द्यांवर तडजोडीची शक्यता बारावीच्या पेपर तपासणीचा तिढा आज सुटणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:22 AM
नाशिक : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला .
ठळक मुद्देबहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत२०११ पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी