सिद्धपिंप्री : कोपर्डीतील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नाशिक शहरातून २४ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सिद्धपिंप्री येथे बैठक झाली. या बैठकीत समाजाच्या वतीने गावत बंद पाळून मोर्चात शंभर टक्के सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातील सर्व शेतकऱ्यांनी मोर्चाच्या दिवशी काम बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, बैठकीत कोपर्डी अत्याचार प्रकरणाची बळी ठरलेल्या कन्येला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसह मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा आदि मागण्यांवियी चर्चा झाली. मोर्चात महिला, शेतकरी, कामगारांसह आबालवृद्ध सहभागी होणार असल्याने गावातून सुमारे दहा हजार समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
मराठा समाजाची बैठक
By admin | Published: September 20, 2016 1:11 AM