लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाने राज्यभरातून मूक मोर्चा काढून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासह समाजाच्या मागण्यांसाठी उभारलेला लढा अधिक तीव्र करण्यासाठी रविवारी (दि.१८)जूनला नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत मुंबईतून काढण्यात येणाऱ्या ९ आॅगस्टच्या मराठा क्र ांती मोर्चाचे नियोजन व मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आढावा घेऊन पुढील कार्यवाहीविषयी विचार विनिमय करण्यात येणार आहे. मराठा समाजाने राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्णांमधून काढलेल्या मोर्चांमध्ये नाशिक जिल्ह्णातून काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चानंतर शहरासह संपूर्ण जिल्हाभरात मराठा संघटनांनी पुन्हा समाजाच्या मागण्यांसाठी एकत्र येत मुंबईतून ९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी मोर्चाच्या समन्वय समितीने नाशिकमध्ये समाजासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना, संस्था, सेवामंडळे व मित्रमंडळांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. औरंगाबादरोड परिसरातील रुक्मिणी लॉन्स येथे रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्णातील मराठा समाजाच्या नागरिकांनी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठीचे नियोजन व तयारीविषयी चर्चा करण्यात येणार असून, सोशल माध्यमांचा प्रचारप्रसारासाठी वापर व त्यासाठी नियम तथा मार्गदर्शक संहिताही निश्चित करण्याविषयी यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
नाशकात १८ जूनला मराठा क्र ांती मोर्चाची बैठक
By admin | Published: June 17, 2017 1:04 AM