इगतपुरी : येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त मोठी शोभयात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.इगतपुरी बस स्थानक येथील श्री दत्त मंदिरापासुन मिरवणुकीस सुरु वात झाली. यात ढोल, ताशा, फटाक्याची आतशबाजी करण्यात येत होती. शिस्तप्रिय भाविकांचा त्यामध्ये मोठा समावेश होता. या शोभायात्रेत विविध प्रकारांचे आकर्षक देखावे, श्री दत्तांची पालखी लक्षवेधी होती. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने संपूर्ण शहर मंगलमय झाले होते.दरम्यान या पालखी व शोभ यात्रा मिरवणुकीत जवळपास वीस हजार भाविकांनी हजेरी लावली होती. अश्चिन नगर येथे पहाटे पाच वाजे पासुन विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यात रु द्राभिषेक, सत्यनारायण पूजा, दत्त जन्मोत्सव, महाप्रसाद, हरीपाठ, महाआरती, भजन आदी कार्यक्र म संपन्न झाले.ओम चैतन्य श्री गुरु दत्त कानिफनाथ मंदिराचे सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी सर्व गुरु सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
इगतपुरीत दत्तजयंती निमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 5:28 PM
इगतपुरी : येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त मोठी शोभयात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
ठळक मुद्देरु द्राभिषेक, सत्यनारायण पूजा, दत्त जन्मोत्सव, महाप्रसाद, हरीपाठ, महाआरती, भजन आदी कार्यक्र म