नांदूरवैद्य : शांतता व सलोख्यात उत्सव साजरे करण्याची परंपरा नांदूरवैद्यला आहे. गावात सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गावकºयांनी, मंडळांनी शिवजयंती साजरी करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नाशिकचे पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी केले. येथील देवळात शांतता समिती व शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांची बैठक संपन्न झाली. यात शिवजयंती साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. शिवजयंती उत्साहात साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी, शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य व नांदूरवैद्य येथील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वाडिवºहे ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, सरपंच दिलीप मुसळे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे, इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती अरु ण मुसळे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण मुसळे, रोहिदास सायखेडे, गणेश मुसळे, शिवसेना शाखाप्रमुख संदीप पवार, शांतता समितीचे सदस्य विशाल काजळे, प्रवीण मुसळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदूरवैद्य येथे शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:35 AM