नायगाव : राज्यातील पोलीसपाटलांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा देत जिल्हाभरातील पोलीसपाटलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांनी केले आहे.सिन्नर तालुका पोलीसपाटील संघटनेच्या वतीने आयोजित आढावा बैठक सिन्नर-सायखेडा रस्त्यावरील महादेवनगर येथे संपन्न झाली. व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अरुण बोडके, सचिव अरुण महाले, संघटक रवंींद्र जाधव, निफाडचे अध्यक्ष अनिल गडाख, येवल्याचे भगवान साळवे, सुनील वाघ, मुज्जाहिम चौधरी आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते.सर्व मागण्या मंजूर होण्यासाठी २८ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील पोलीसपाटील एकदिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. यावेळी धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मुकेश कापडी यांनी दिली. यावेळी सिन्नर तालुका उपाध्यक्ष मोहन सांगळे, सचिव संदीप सानप, वाल्मीक कडवे, आदींसह जिल्हाभरातील पोलीसपाटील उपस्थित होते. तालुकाध्यक्ष मुकेश कापडी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.राज्यातील पोलीसपाटलांच्या मानधनात वाढ करणे, राज्यातील पोलीसपाटलांच्या रिक्त जागा भरणे, प्रवास भत्ता मिळावा, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी, मृत पोलीसपाटलांच्या वारसांना सेवेत सामावून घेणे, पोलीसपाटलाची नियुक्ती एकदाच करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
पोलीसपाटील संघटनेतर्फे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:07 PM
राज्यातील पोलीसपाटलांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा देत जिल्हाभरातील पोलीसपाटलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांनी केले आहे.
ठळक मुद्दे धरणे आंदोलन : विविध समस्यांवर चर्चा